पालघर : हिवाळा असल्यानं सध्या पालघर जिल्ह्यामध्ये चांगलीच थंडी पडू लागली आहे. अशा वातावरणा मध्ये जिल्ह्यातल्या पाणथळ भागांमध्ये सध्या देशी-विदेशी पक्षांचे थवे दिसून येवू लागले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या खाडी भागां मध्ये सध्या स्थानिक स्थलांतरित पक्षी स्पॉटबिल्ड डक म्हणजेच हळदीकुंकू बदकाचे थवे दिसून येत आहेत. या बदकांच्या पंखाच्या बाजूने पांढऱ्या, तपकिरी आणि हिरव्या रंगाचे पट्टे असतात. तसचं त्यांचे पाय नारंगी तांबड्या रंगाचे असतात.
पहा व्हिडिओ :
यांच्या चोची वर लाल आणि पिवळे रंग दिसत असल्याने या बदकांना स्थानिक भाषेमध्ये हळदीकुंकू बदक असं ही म्हणतात. इतर बदकांच्या आकारापेक्षा हि बदकं मोठ्या आकाराची असततात. जुलै ते सप्टेंबर हा या पक्षांचा विणीचा हंगाम असतो. नदी, सरोवर, तलाव, खारफुटीची ठिकाणं यासारख्या पाणथळ भागां मध्ये सध्या या बदकांचे थवे दिसून येत असल्याने पक्षी मित्रांना पक्षी निरीक्षणाची चांगलीच पर्वणी लाभली आहे.