पालघर : गुणवत्तापुर्वक सेवेसाठी पालघर पोलीस ( Palghar Police ) दलातल्या दोन अधिका-यांना राष्ट्रपती पोलीस पदक ( President’s Police Medal ) जाहीर झालं आहे. महाराष्ट्र राज्यातल्या एकूण 39 पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना त्यांच्या गुणवत्तापुर्वक सेवेसाठी आणि ४ पोलीस अधिकारी यांना त्यांच्या उल्लेखणीय कामगिरी बद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर झाले आहेत. त्यात पालघर पोलीस दला मधल्या आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस उप अधीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या अनिल लक्ष्मण लाड आणि नेमणुक स्थानिक गुन्हे शाखेत , पोलीस उप निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या रविंद्र बाबुराव वानखेडे या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी आणि गुणवत्तापूर्वक सेवा करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना केंद्र शासनाकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनी ( Republic Day ) राष्ट्रपती पोलीस पदक दिलं जातं. राष्ट्रपती पोलीस पदक हे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दिला जाणारा सन्मान आहे. हे राष्ट्रपती पोलीस पदक हे १ मार्च १९५१ पासून दिलं जातं.