पालघर : पश्चिम रेल्वेचे चौपदरीकरण तसेच समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग डी.एफ.सी.सी कार्यान्वित होत असताना सफाळे येथील रेल्वे फाटक क्र ४२ दिनांक ३१ मार्च २०२५ पासून पदाचाऱ्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था न देता एकाएकी कायमस्वरूपी बंद करण्यात असल्याने सफाळे विकास कृती समिती, पंचक्रोशीतील ग्रामपंचायती आणि सहयोगी संघटनेच्या वतीने ‘जनाक्रोश आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनात हजारो पंचक्रोशीतील नागरिक, व्यापारी, मच्छि विक्रेत्या, विद्यार्थी आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी होते.
सफाळे गाव आणि सफाळे स्टेशन लगत असलेली बाजारपेठ, शिक्षण संस्था, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, मुख्य बाजारपेठ, बँक, मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालय असे जवळपास सर्वच मुख्य कार्यालय, संस्था आणि प्राधिकरणे असून रेल्वे फाटक लेव्हल क्रॉसिंग नंबर ४२ हा एकच मार्ग सफाळे आणि त्याच्या लागत वसलेल्या इतर गावांशी संपर्क ठेवण्याचा प्रमुख मार्ग आहे. याच संबंधित मार्गाने दररोज ४२ गावांतील किमान 50 हजार पेक्षा जास्त नागरिकांची वर्दळ याच रेल्वे फाटकातून होत असते.
सफाळे रेल्वे फाटक ४२ बंद झाल्याने हजारोच्या संख्येने प्रवास करणारे दैनंदिन प्रवासी, बागायतदार, दूध उत्पादक, मच्छिमार, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. असे सर्व जणं या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
संबंधित आंदोलनाची दखल घेत उप जिल्हाधिकारी यांनी स्वतः आंदोलनास भेट देऊन फाटक आणि संपूर्ण स्टेशनची पाहाणी केली. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन परिस्थितीचा आढावा दिला असता जिल्हाधिकारी यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोमवारी समिती सोबत एक बैठक आयोजित केली आहे. तसेच पालघर लोकसभेचे खासदार यांनी देखील मीटिंग रविवारी मिटिंग आयोजित केली आहे.
संबंधित फाटक कोणत्याही पर्यायी व्यवस्थे शिवाय बंद करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ करणे असा याचा अर्थ निघत आहे. त्यामुळे फाटक बंद केल्यामुळे जर नागरिकांची गैरसोय होत असेल आणि यामुळे जर जीवितहानी होत असेल तर यास आपण जबाबदार असाल अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी आणि डी आर. एम यांना देण्यात आले आहे.
पर्यायी व्यवस्थे शिवाय रेल्वे फाटक बंद करणे हे चुकीचे आहे असून सफाळे रेल्वे क्रॉसिंग फाटक क्र ४२ पुन्हा सुरू करावा आणि जोपर्यंत पादाचार्यांसाठी पर्यायी व्यवस्था तयार होत नाही तोपर्यंत सफाळे रेल्वे फाटक ४२ बंद करू नये, अन्यथा सफाळे विकास कृती समिती अति उग्र आंदोलन करेल असा इशार देखील आंदोलन कर्त्यांकडून देण्यात आला आहे.