पालघर : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली ( National Disaster Management Authority New Delhi ) आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर ( District Disaster Management Authority Palghar ) यांच्या संयुक्त विद्यमाने 14 मे ला पालघर जिल्ह्यातल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ( Tarapur Nuclear Power Project ) सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रंगीत तालीम ( National drill on safety ) आयोजित करण्यात येणार आहे.
जर तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात काही अपघात झाला तर रेडिएशनमुळे ( Radiation ) लोक बाधित होऊ नये त्यासाठी त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाच्या सर्व एजन्सीकडून तात्काळ मदत मिळणे तसचं प्रत्येक विभागात त्यांची जबाबदारी माहिती करून देणे, त्यासंदर्भात कार्य करणे, तत्परता असणे असा या रंगीत तालीम मागचा उद्देश आहे.
पूर्वी दर दोन वर्षांनी अशा प्रकारचा अभ्यास केला जात होता मात्र 2021 पासून तर तीन वर्षांनी आयसीसीआर अभ्यास केला जात आहे. या वर्षापासून दरवर्षी रंगीत तालीम आयोजित करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने 6 मे ला दिल्ली मधून ऑनलाईन ओरिएंटेशन बैठक होणार आहे. त्या नंतर 13 मे ला टेबल टॉप एक्सरसाइज होणार आहे. आणि 14 मे ला रंगीत तालीम होणार आहे.