पालघर : पालघर जिल्ह्यातल्या ( Palghar District ) महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पासाठी ( Wadhwan Port Project ) भूसंपादनाची प्रक्रिया ( Land Acquisition Process ) वेगाने सुरू आहे. प्रशासनाने आता बाधित शेतकरी आणि जमीनधारकांना नुकसानभरपाई वाटपाला गती दिली आहे. पालघर आणि डहाणू तालुक्यातल्या ( Palghar and Dahanu talukas ) २२ गावांतील संपादित जमिनी आणि मालमत्तांचे निवाडे मंजूर झाले आहेत. संबंधितांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ च्या कलम ३ (G) अंतर्गत ( Under Section 3(G) of the National Highways Act, 1956 ) वाढवण बंदरासाठी रस्ता आणि रेल्वे मार्ग ( Road and Rail links ) उभारणीसाठी डहाणू तालुक्यातल्या १० आणि पालघर तालुक्यातल्या १२ गावांमधील जमिनींचं संपादन करण्यात आलं आहे.
या संपादित जमिनी, बांधकामे, फळझाडे, वनझाडे, विहिरी, बोअरवेल, पाईपलाईन, हौद, तलाव यांसह इतर मालमत्तांचे निवाडे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ( National Highways Authority of India ) मंजूर करण्यात आले आहेत. मुख्य रस्त्यालगतच्या सर्व्हिस रोडसाठी संपादित क्षेत्रातील लाभार्थींना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, नुकसानभरपाई वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बाधित खातेदारांनी आवश्यक कागदपत्रे भूसंपादन अधिकारी कार्यालयात किंवा संबंधित तलाठी कार्यालयात सादर करावीत. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मुदतीत नुकसान भरपाई स्वीकारली नाही तर संबंधित रक्कम ही पालघरच्या दिवाणी न्यायालयात ( Civil Court in Palghar ) जमा करण्यात येईल, असा इशारा ही प्रशासनाने दिला आहे.
















