नीता चौरे / पालघर : कोरोना बधितांचा आकडा नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनास यश आलं होत मात्र काही दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकड्यात थोड्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी पालघर, बोईसर आणि डहाणू रेल्वे स्थानकांची पाहणी केली.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दळणवळणाचं मुख्य साधन रेल्वे असुन या रेल्वे स्थानकांमध्ये तसचं रेल्वे मध्ये प्रवासी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमाचं पालन करत आहेत का ? नागरिक मास्क, सॉनिटायझर चा वापर करत आहेत का ? सोशल डीस्टसिंग चे नियम पाळत आहेत का ? या बाबतची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी पालघर, बोईसर , डहाणू रेल्वे स्थानकात केली.
विशेषतः दिल्ली, राजस्थान, गुजरात, आाणि गोवा हुन डहाणू ,बोईसर, पालघर रेल्वे स्टेशन वर पोहचणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कोविडची चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत .
कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबधित रेल्वे स्थानकावर नियूक्त केलेल्या केंद्राची पाहणी करुन संबंधितांना काही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या वेळी प्रातं अधिकारी अशिमा मित्तल , धनाजी तुळसकर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, तहसिलदार सुनिल शिंदे , राहुल सारंग, गटविकास अधिकारी, रेल्वे स्टेशन अधिक्षक, रेल्वे स्टेशन मधील कर्मचारी , सुरक्षा कर्मचारी बोईसर ग्रामपंचातीचे पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी नागरिकांच्या अडचणी जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यानी जाणून घेतल्या.