नवी मुंबई : कोविड -19 च्या महामारीमुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असताना, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोकण भवन राजपत्रित अधिकारी महासंघ, वस्तू व सेवा कर अधिकारी समन्वय समिती यांच्या संयुक्त सहकार्याने कोकण 23 डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण जगावर घोंगावत असलेल्या कोरोनारुपी संकटामुळे रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. कोकण भवनातल्या महिला भोजन कक्षात सकाळी 10.30 वाजता या उपक्रमास सुरुवात होईल. तर संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत रक्तदात्यांना इथं रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे कोकण भवन आणि आसपासच्या परिसरातल्या सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांनी मानवहितार्थ जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे आणि या समाजकार्यात कर्तव्य भावनेने आपला सहभाग नोंदवावा. जेणे करुन रक्ताचे केलेले संकलन कोविड-19 रुग्णांसाठी जीवदान ठरेल. असे आवाहन कोकण भवन राजपत्रित अधिकारी महासंघ, वस्तू व सेवा कर अधिकारी समन्वय समितीकडून करण्यात आलं आहे.