पालघर : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या पालघर जिल्ह्यातल्या १७७३ अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६१७ हप्ते जमा झाल्यानं ९२,३४,००० रुपये इतकी रक्कम शासनास परत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्यापैकी २३९ शेतकऱ्यांनी ११३१ हप्त्यापोटी २२,६६,००० रुपये इतकी रक्कम शासनास परत केली आहे.
तसचं केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या पालघर जिल्ह्यातल्या १४६३ आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ६९२६ हप्ते जमा झाल्यानं १,३८,५२,००० रुपये इतकी रक्कम शासनास परत करण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्यानुसार त्यापैकी १८७ शेतकऱ्यांनी ९०४ हप्त्यापोटी १७,९६,००० रुपये शासनास परत केले आहेत.
तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या ५५०१ लाभार्थ्यांची भौतिक तपासणी (Physical Verification) करण्याचे निर्देश शासनानं दिल्यानं २०४९ लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण झालेली असून उर्वरीत ३४५२ लाभार्थ्यांची भौतिक तपासणी तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व तहसिलदार गटविकास अधिकारी / तालुका कृषि अधिकारी यांना दिलेत.