पालघर : भारत निवडणूक आयोगामार्फत 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पालघर जिल्हयात जिल्हा स्तरावर, मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्तरावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. पालघर जिल्हा पातळीवरचा राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम हा तहसिल कार्यालयाच्या सभागृहात 25 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमात नव्यानं नोंदणी झालेल्या मतदारांच्या फोटो ओळखपत्राचे वाटप आणि या मतदारांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसचं दिव्यांग मतदार, सैनिक मतदार, महिला मतदार यांना देखील फोटो ओळखपत्राचे वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून ‘सभी मतदाता बने: सशक्त, सतर्क, सुरक्षित एवं जागरूक “ (Making our Voters Empowered, Vigilant, Safe and Informed) असं अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचं घोषवाक्य निश्चित करण्यात आलं आहे.
मतदार जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून भारत निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यकम आयोजित करण्यात येत आहे.