पालघर : कोव्हिड – १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या दृष्टिकोनातुन राज्यात ५ एप्रिलपासून रोजी पासून ते ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यात देखील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असताना दिसून येत आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी काही कडक निर्बंध जिल्हाधिका-यांनी लागू केले आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठीचे कडक निर्बंध :
त्यानुसार आता रिक्षा मध्ये ऑटोरिक्षा चालक अधिक २ प्रवासी अशा तीनचं जणांना प्रवास करता येणार आहे. टॅक्सीत वाहन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनं प्रवास करता येईल, बस मध्ये जेवढ्या सीट्स असतील तेवढ्याच प्रवास्याना प्रवास करता येईल, उभं राहून प्रवास्याना प्रवास करता येणार नाहीये. वाहनातल्या सर्व प्रवास्यांना मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. प्रवास्यांनी मास्क घातले नसल्यास त्या वाहन चालकाकडून दंड आकारण्यात येईल, प्रत्येक फेरीनंतर वाहन निर्जंतुकीकरण (sanitized) करणं बंधनकारक आहे.
जिल्हयातल्या सीमा तपासणी नाका ( Border check post ) इथून जिल्हयात येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे चालक, वाहक आणि इतर कर्मचारी यांच्याकडे एप्रिल पासून RTPCR चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत असणं बंधनकारक असेल. अन्यथा त्यांच्याकडून १००० रूपये दंड आकारण्यात येईल. ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या चालकानं प्लॅस्टीक आवरण घातलं असल्यास RTPCR चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत असण्यापासून अपवाद करता येईल. )
खाजगी वाहतूक सोमवार ते शुक्रवार म्हणजे आठवड्यातुन 5 दिवसचं सकाळी ७ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरु राहील. त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहील अशी माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली आहे.