पालघर दि. 17 : महिला आर्थिक विकास महामंडळला महिला सशक्तीकारणासाठी योजनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करू असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झीरवळ यांनी केले. पालघर जिल्हातील जव्हार येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविमच्या जव्हार येथील क्षेत्रीय समन्वयक कार्यालयाचे उद्घाटन श्री झीरवळ यांचे हस्ते झाले त्यावेळी माविमच्या कार्याचे कौतुक करताना ते बोलत होते. सदर कार्यक्रमात “तेजश्री फायनान्सिअल सव्हिंसेस या योजनेंतर्गत ५० गरजू व अतिगरीब ultra poor महिलांना श्री झीरवळ तसेच पालघर चे खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भूसारा, आमदार हिरामणजी खोसकर, जव्हार न पचे नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ भिकुशेठ पटेल यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. वेळी पालघर जिल्हात माविम ने केलेल्या कार्यअहवालाचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करणायत आले. पालघर जी. प. चे बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, जव्हार प्रकल्प अधिकारी प्रजीत नायर, तहसीलदार श्री शिंदे, जी. प. सदस्य सुनिता धूम, माजी जी प. सदस्य अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष कांचन चुंबळे, जव्हार न. प. नगर सेविका संगीता आहिरे, स्वाती सोनावणे, हर्षदा तामोरे, जयश्री चव्हाण, रश्मीन मणियार, कमल कुवरा, वैभव अभ्यंकर, दीपक कांगणे, माजी नगरसेवक चित्रांगण घोलप, तसेच प्रकाशजी चुंबळे, तालुका संघटक व माजी नगरसेविका संगीता जाधव, मनीषा वाणी, शलाका आयरे यांच्यासह विविध शासकीय पदाधिकारी व महिलावर्ग सोशल distansing चे नियम पाळून उपस्थित होत्या.
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा पालघर द्वारा सुरु असलेल्या एनयुएलएम कार्यक्रम अंतर्गत माविम क्षेत्रीय/ शहर स्तर संघ कार्यालय व महिला करिता विविध प्रशिक्षण सुरु करण्यासाठी जव्हार नगर परिषदे कडून हॉल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर जागेची नवीन पत्रा टाकून दुरस्ती करून देण्याचे निर्देश अध्यक्ष नगर परिषद जव्हार यांनी दिले. तेजश्री अंतर्गत वारली चित्रित साडी निर्मिती उद्योग माहेर लोक संचालित साधन केंद्र च्या माध्यातुन सुरु करण्यात येत आहे. या करीता आयुष संस्थे द्वारा वारली चित्र प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री झिरवाळ यांचे हस्ते करण्यात आले.खासदार श्री गावित यांनी महामंडळानी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन व क्षमता निर्माण करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी श्रीमती ज्योतीताई यांचे खंबीर नेतृत्वात वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन केले,
आमदार सुनील भूसारा यांनी माविम ने विक्रमगड व मोखाडा तालुक्यात तेजश्री कार्यक्रमाची सुरवात करावी, या कार्यालया साठी आवश्यक साहित्य व गाव पातळीवर फिरण्यासाठी वाहन व इतर आवश्यक सर्व मदत करण्यात येईल असे प्रतिादन केले. आमदार हिरामण खोसकर यांनी महिलांना १० हजार ऐवजी २५००० रुपयाची कर्ज उपलब्ध करून द्यावे असे प्रतिपादन केले. अध्यक्ष माविम ज्योती ठाकरे यानी मझ्या सारख्या सामान्य कार्यकर्तीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामंडळाचे अध्यक्ष पद देऊन महाराष्ट्रातील गोर गरीब महिलांचे प्रश्न सोडविण्याचे जबाबदारी दिली त्यास मी कटिबद्ध आहे. महाराष्ट्र ये देशातील एकमेव राज्य आहे जिथे अति गरीब महिलांना केवळ ७० पैसे मासिक व्याज दराने उपजीविके करिता कर्ज उपलब्ध करून दिले आहे. महामंडळाला इतर महामंडळा प्रमाणे कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसताना महिलांच्या बचतीच्या माध्यमातून विकास प्रक्रिया महिला पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न माविम गेली ४५ वर्ष पासून करीत आहे. असे प्रतिपादन ज्योती ठाकरे यांनी केले.
माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी अरविंद गोरे यांनी तर सूत्र संचालन योगिता चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन श्री अजित पाटील व्यवस्थापक बाडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करीता श्रीमती निकीता भोईर व्यवस्थापक माहेर लोक संचालित साचन केंद्र, कंचाड, श्री प्रीतेश पाटील एम आय एस सल्लागार, श्रीमती आशा कोटींना क्षेत्रीय समन्वयक जव्हार, श्रीमती उर्मिला भोईर. व इतर सर्व संबधीतानी सहकार्य केले