पालघर : थंडीची चाहुल लागताच किनारपट्टी लगतच्या पाणथळ भागांत वेगवेगळ्या परदेशी पक्षांच्या आगमनाला सुरुवात होते. पालघर जिल्ह्यातही असे वेगवेगळे परदेशी पक्षी आपली हजेरी लावत असतात. त्यातीलच एका ब्राउन हेडेड गल (Brown-headed gull ) म्हणजेच तपकिरी डोक्याचा कुरव या पक्षांनी यंदा सध्या पालघर जिल्ह्यात हजेरी लावली आहे.
जिल्ह्यातल्या चिंचणी समुद्र किनारी या तपकिरी डोक्याचा कुरव पक्षांचे थवेच्या थवे पाहायला मिळत आहेत. हा पक्षी दिसायला जरी पांढरा दिसत अला तरी विणीच्या हंगामात या पक्षाच्या चेहेऱ्याचा पूर्ण भाग तपकिरी रंगाचा होतो. मासे, मृदुकाय जीव ,मृत प्राण्यांचे अवशेष हे यांचं प्रमुख अन्न आहे. हा पक्षी भारतीय उपखंडात भारतासोबत मंगोलिया ,बांगलादेश, म्यानमार,पाकिस्तान,श्रीलंका या देशातही दिसून येतो.