पालघर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडं विद्युत पोलवर पडल्यानं, तसचं वादळानं ठीक ठिकाणी पोल उन्मळून पडल्यानं, तारा तुटल्यानं काही दिवस सर्वत्र विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मात्र या चक्रीवादळाच्या काळात विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र फिल्डवर कार्य करत होते. आणि काही दिवसांच्या काळात त्यांनी अहोरात्र काम करून हा विद्युत पुरवठा सुरळीत केला.
त्यांच्या या कार्याची दखल घेत सोमवारी उमरोळीच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेच्या वतीनं महावितरणच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अनिल तरे , शाखाप्रमुख अरुण पाटील, उमरोळी ग्रा.प . उपसरपंच जितेंद्र घरत, पंचाळी गावचे सरपंच भौतेश पाटील, सदस्य दीपेश पाटील, रश्मी पाटील, अंकिता तरे, भास्कर घरत, विकास कारभारी, सागर घरत, बिरवाडीचे कार्यकर्ते अल्पेश राऊत आदी उपस्थित होते.