मुंबई : मुंबई येथील व्हीपीएमएस आर झेड शहा ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा योजना आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी सलाम मुंबई फाउंडेशन चे प्रतिनिधी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनाची सुरूवात तंबाखुमूक्ती ची शपथ देऊन करण्यात आली. कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी पोस्टर, व्हीडिओ, चित्रफीती व्दारे तंबाखू बद्दल जनजागृती करून तंबाखुमूक्तचे आवाहन केले.
यावेळी व्हीपीएमएस आर झेड शहा महाविद्यालया चे प्रभारी प्राचार्य कविता शर्मा, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विजयालक्ष्मी कमलराजन, प्रा. एम जी सांवत, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे लिडर दिपाली सोनावले, हर्ष सावंत आणि त्यांचे सहयोगी हर्ष मापुस्कर साक्षी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.