पालघर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महारष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आज भाजपकडून पालघरच्या चार रस्ता इथं काही काळ चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतले होते. दरम्यान पोलिसांनी काही कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलं. काही काळ चाललेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे मात्र चारही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्राफिकजाम झाली. ज्याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना तात्कळत उभं राहून सोसावा लागला. या आंदोलना दरम्यान कोणत्याही प्रकारची सोशल डिस्टन्सिंग दिसून आली नाही.
तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी, घोषणाबाजी करत आज कॉग्रेस पक्षाकडून देखील पालघर मधल्या पाचबत्ती इथं काही काळ आंदोलन करण्यात आलं. या दोन्ही आंदोलना दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि कॉग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.