पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या ओसरविरा ( मानकरपाडा ) इथं सोमवारी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास अंगावर वीज पडल्यानं एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख कदम यांनी दिली आहे.
रवीन बच्चू कोरडा ( 17 वर्षे ) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून मेहुल अनिल मानकर ( 14 वर्षे ), दिपेश संदीप कोरडा ( 14 वर्षे ), चेतन मोहन कोरडा ( 13 वर्षे ) अशी जखमी तरुणांची नावं आहेत. हे सर्व संध्याकाळी शेतावर गेले असताना ही घटना घडली आहे.