पालघर : पालघर मध्ये राजेश घुडे नावाच्या तरुणावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण सोमवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास पालघर मधल्या खारेकुरण इथं असलेल्या आपल्या राहत्या घरी जाण्यासाठी कारनं निघाला होता. त्या दरम्यान मोटरसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर फायरिंग केली. आणि ते तिथून पसार झाले. मात्र सुदैवानं तो तरुण बचावला. कारण गोळी कारच्या मागच्या काचेला होल करत कारच्या आतमध्ये शिरली.
घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलीस आता गोळीबार करणा-या त्या दोन अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहेत. मात्र हा गोळीबार कोणी केला आणि का केला ते अद्याप कळु शकलेलं नाहीये.