पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या तारापुर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भारत केमिकल्स या कंपनीत रात्री साडे नऊ ते दहा वाजताच्या दरम्यान भीषण स्फोट झाला. या स्फोटात 6 कामगार जखमी झाले. स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना जवळच्या संजीवनी हॉस्पिटल उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत.
पहा व्हिडिओ …..
प्राथमिक उपचारानंतर रविवारी सर्व जखमींना घरी सोडण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. प्राथमिक माहितीनुसार शोर्टसर्किटमुळे हा स्फोट झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.