पालघर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनं तिथल्या शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी गेले. सर्वत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी झाली. निसर्गाच्या या प्रकोपानंतर कठीण प्रसंगात आपल्या सामाजिक जवाबदारीचं नेहमीचं भान ठेवणारे आणि गेल्या दीड वर्षाच्या कोरोनाच्या अत्यंत कठीण प्रसंगात सातत्यानं सर्व स्तरावर आपलं सामाजिक कर्तव्य निभावून दिवस रात्र आपल्या कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांपासून सर्वांनाच मदतीचा हात देणारे पालघर जिह्यातले निर्धार संघटनेचे प्रमुख कुंदन संखे यांनी पूरग्रस्तांना मदत ह्वावी या हेतूनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अडीच लाखांचा धनादेश महाराष्ट्राचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.