पालघर : पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या विराज एसएमएस 2 कंपनीत शनिवारी संध्याकाळच्या वेळी यूनियनला घेवुन पोलीसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी आज बोईसर पोलीसांनी २७ जणांना अटक करून पालघर कोर्टात हजर केलं. यावेळी पोलिसांनी न्यायालयाला तपासासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यानंतर न्यायालयानं या २७ जणांना १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी 400 ते 500 लोकांच्या विरुध्द हाफ मर्डर, सरकारी कामात अरथडा या कलमांसह इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे या घटनेबाबत कामगारांचं म्हणनं आहे की, कंपनीच्या मनेजमेंटनं बाहेरून काही गुंड लोकांना बोलवून त्यांच्या आधारे कंपनी दुसर्या कामगारांची भरती करण्याच्या प्रयत्न करत होती. आणि ज्यावेळी कामगारांनी या गोष्टीला विरोध दर्शविला तेव्हा पोलीस पोलीस प्रशासनानं आमची मदत करण्याएवजी आमच्यावर लाठीचार्ज केला. त्यानंतर परिणामस्वरूप संतप्त कामगारांनी पोलिसांवर दगडफेक केली.
शनिवारी संध्याकाळच्या दरम्यान पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या विराज एसएमएस 2 या कंपनीत मिटिंग दरम्यान मुंबई लेबर युनियनच्या पदाधिकारी, कामगारांनी एकच तोडफोड केली आणि पोलीसांवर देखील हल्ला केला.या हल्ल्यात १९ पोलीस जखमी झालेत. यावेळी संतप्त कामगारांनी पोलिसांच्या गाड्यांची, आसपासच्या गाड्यांची आणि कंपनीतल्या ऑफिसांची मोठया प्रमाणात तोडफोड केली. परिस्थिती पाहता काल संध्याकाळपासून कंपनीत मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी आता बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आतापर्यंत 43 जणांना अटक करण्यात आली आहे.
तीन चार दिवसांपासून या कंपनीत मुंबई लेबर युनियनच्या कामगारांकडून संप पुकारण्यात आला होता. तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या विराज प्रोफाइल कंपनीत मुंबई लेबर युनियन कडून पुकारण्यात आलेल्या संपाच्या अनुषंगानं या कंपनीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व परिस्थिती पाहता शनिवारी कंपनीत पोलीस प्रशासन, लेबर युनियन अधिकारी आणि कंपनी मॅनेजमेंट ची मिटिंग सुरू होती. दरम्यान जे कंपनीतील लोकं आहेत आणि इतर लोकं आहेत त्यांनी काम बंद करावं असं मुंबई लेबर युनियनचे लोकं सांगत होते. मात्र काही लेबर काम करण्यास तयार होते. आणि ते काम करण्यासाठी आतमध्ये जात असताना त्यांना मुंबई लेबर युनियनच्या लोकांनी अडवल्यामुळे त्यांच्यात संघर्ष निर्माण होऊन भांडणं झाली. बिघडलीलेली ही परिस्थिती हाताळण्यासाठी तिथे पोलीस दल गेलं असता संतप्त मुंबई लेबर युनियनच्या अंदाजे 1500 ते 2000 हजारांच्या संख्येनं उपस्थित असलेल्या कामगारांनी पोलिसांवर हल्ला केला. आणि दगडफेक केली. यामध्ये 19 पोलीस जखमी झाले असून त्यामधील काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यात मोठया प्रमाणात पोलिसांच्या गाड्यांची आणि इतर गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच कंपनीत घटनास्थळी जिल्ह्यातल्या पोलीस मुख्यालयातून आणि आसपासच्या पोलीस ठाण्यातुन पोलीस बंदोबस्त इथं मागवण्यात आला. आणि तैनात करण्यात आला.पोलिसांनी जेमतेम बाहेर धावत निघून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न यावेळी केला. त्यानंतर शनिवारी रात्री पोलीस प्रशासनाकडून शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि स्ट्रायकिंग फोर्सेस लावण्यात आल्या आहेत.