पालघर : पालघर जिल्ह्यातल्या शिरगाव मध्ये एक तरुण पब्जी गेम खेळता खेळता एका बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची घटना घडली आहे. सध्या या तरुणावर पालघर मधल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालघर मधल्या शिरगाव इथं राहणारा 16 वर्षीय शादान शेख हा तरुण काल संध्याकाळी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर उभं राहून पब्जी गेम खेळ होता. तेव्हा पब्जी गेम खेळता खेळता त्याला भानचं राहिलं नाही की आपण कुठे आहोत. आणि तो इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. आणि जखमी झाला. सध्या या तरुणावर पालघर मधल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.