पालघर : ह्मावान खात्याकडून पालघर जिल्ह्यात आज ओरेंज अलर्ट देण्यात आला होता. ह्मावान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात सर्वत्र आज सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नाले आदी भरून वाहत होते. पालघर, बोईसर, धनानीनगर या भागांत जोरदार पाऊस सुरु होता. मात्र आता सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बरत आहे.
आज झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात आता भात पेरणीला अनुकूल असं वातावरण तयार होण्यास सुरु होईल त्यामुळे आता पावसाची आतुरतेनं वाट बघणारा जिल्ह्यातला बळीराजा देखील सुखावला आहे. सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र अंधारून आल्यासारखं वातावरण सकाळपासून कायम आहे. आज जिल्ह्यात चांगला पाउस बरसत असल्यानं वातावरणातली उष्णता कमी झाल्यानं नागरिकांनी ही सुटकेचा श्वास घेतला आहे.