पलघर 24 : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे राज्यात उद्भवलेल्या अर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे पुर्नज्जीवन राज्य शासनाने केले आहे. खावटी अनुदान योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांनी भरावयाचे अर्ज प्रकल्प कार्यालय डहाणू यांच्याकडुन ग्रामपंचायत आणि नागरी भागासाठी गठीत केलेल्या समितीकडे देण्यात येत आहेत.
या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, डाकसेवक, शिक्षक आणि प्रकल्प कार्यालयाचा प्रतिनिधी आहे. अनुसूचित जमातीच्या कुटुंबाला खावटी योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा आणि कागदपत्रांची पुर्तता लवकर व्हावी या उद्देशाने प्रकल्प कार्यालय डहाणू यांनी बुधवार दिनांक 28.10 .2020 रोजी ग्रामपंचायतीमध्ये “खावटी अनुदान योजना महासंपर्क अभियानाचे” आयोजन केले आहे.
सन 2020-21 या वर्षी चालू केलेल्या खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या निकषाप्रमाणे आदिवासी बांधवांनी दिनांक 28 .10.2020 आपल्या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या शासकिय कर्मचाररी यांच्याशी संपर्क करून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरावेत असे आवाहन डहाणू प्रकल्पाच्या
प्रकल्प अधिकारी अशिमा मित्तल यांनी केले आहे. • मनरेगावर 1 दिवस कार्यरत असलेला आदिवासी मजुर (01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत)
आदिम जमातीतील सर्व कुटुंबे
पारधी जमातीतील सर्व कुटुंबे
भुमिहिन शेतमजूर
• परितक्ता/ घटस्पोटीत महिला/ विधवा/ कुमारी माता अपंग व्यक्ती असलेले कुटुंब व अनाथ मुलांचे संगोपन करणारे आदिवासी कुटुंब
वैयक्तिक वनहक्कधारक कुटुंबे
तरी खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अनुसूचित जमातीच्या कुटुंबानी खावटी
अनुदान योजना महासंपर्क अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन श्रीमती मित्तल यांनी केले आहे.