पालघर दि २३-दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यभरात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते . दसऱ्याच्या दिवशी अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा , तसेच त्या अनुषंगाने शासकीय महसूल जमा व्हावा . याकरीता राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालये । उप प्रादेशिक परिवहन कार्यालये रविवार दिनांक २५.१०.२०२० या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवणे आवश्यक असलेबाबत मा . परिवहन उप आयुक्त , परिवहन आयुक्त कार्यालय , मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रं .१८७ / संकीर्ण ४६२० / का .८ ( ९ ) / वाहन नोंदणी / २०२० / जा.क्रं .८७७१ , दि .२३.१०.२०२० अन्वये कळविण्यात आलेले आहे . त्यानुसार दिनांक २५.१०.२०२० रोजी वाहन नोंदणीचे व त्या आनुषंगिक कर वसुलीचे कामकाज सुरू ठेवण्यात आलेले आहे .असे उपपरिवहन अधिकारी वसई यांनी कळविले आहे