पालघर जिल्ह्यात ४९ व्या कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा सुरु
पालघर : ४९ वी कोंकण परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धा ( Konkan Zonal Police Sports Competition )पालघर जिल्ह्यात संपन्न होत आहे. या ४९ व्या कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत मिरा- भाईंदर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी पहायला मिळाली. मिरा- भाईंदर पोलिसांनी आतापर्यंत विविध क्रीडा प्रकारात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य असे जवळपास 220 पदकं मिळवली आहेत.
या क्रीडा स्पर्धा 3 जानेपर्यंत असणार आहेत. ४९ व्या कोंकण परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, मिरा- भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, ठाणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या ठिकाणच्या पोलीस सघांचा समावेश आहे. या स्पर्धांमध्ये अॅथलेटिक्स, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, कुस्ती, जुडो, तायक्वांदो, वु-शु, बॉक्सींग, हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी आणि जलतरण यासारख्या खेळ प्रकारांचा समावेश आहे.
कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत नवी मुंबई आयुक्तालयाचे १९१, रत्नागिरी पोलीस दलाचे ६५, मिरा भाईंदर, वसई-विरार आयुक्तलयाचे १५४, ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे १११, रायगड पोलीस दलाचे १५१, सिंधुदुर्ग पोलीस दलाचे १०१ आणि पालघर पोलीस दलाचे १४० अशा एकुण ९१३ पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.