पालघर: पालघर जिल्ह्यातल्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंचपाडया जवळ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्रीच्यावेळी भरधाव वेगानं जात असलेल्या ( बस क्रमांक – AR-01,P 8484 ) लक्झरी बसला अचानक भीषण आग लागली. सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये. या घटनेच्या सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस अहमदाबादहून हैदराबादकडे जात होती. दरम्यान कासा जवळील चिंचपाडयाच्या थोडं अगोदर या बसचा मागच्या बाजुचा एक टायर फुटला. आणि चिंचपाडा इथं येता येता या बसचा मागच्या बाजुचा दुसरा टायर देखील फुटला. ज्यामुळे बसला आग ही लागली. काही वेळातचं बघता बघता आगीनं संपूर्ण बसला वेढलं आणि ही बस आगीत जळून खाक झाली.