पालघर : पालघर जिल्ह्यातल्या शासन मान्यता प्राप्त नसलेल्या १६ अनधिकृत शाळांवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत कारवाई करण्यात आली असून त्या शाळांच्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाचे आयुक्तांच्या आदेशानं आणि पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पालघर तालुक्या मधल्या ५ आणि वसई तालुक्या मधल्या ११ शाळांचा समावेश आहे. या शाळांना गेल्या अनेक वर्षांपासून शाळा बंद करण्याबाबतच्या नोटीसा देण्यात येत होत्या, मात्र तरी देखील या शाळा अनेक वर्षांपासून अनधिकृत पणे सुरूच होत्या. मात्र आता आयुक्तांच्या आदेशानुसार या शाळांवर कारवाई करण्यात आली आहे.
सुमित्रा एज्युकेशन सोसायटी डी एस मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बोईसर,लिटिल एंजल प्रायमरी स्कूल बोईसर,मातोश्री आशादेवी विद्या मंदिर नगर शिगाव रोड, स्वामी विवेकानंद विद्यालय, सफाळे ज्ञानोदय विद्यामंदिर धोंदल पाडा केळवे रोड या पालघर तालुक्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली तर वसई तालुक्यातील स्वामी विवेकानंद, सेंट झेवियर अँड मेरी कॉन्व्हेंट स्कुल, कुमर मेरी पब्लिक स्कूल, शांतिनिकेतन विद्यालय, लॉर्ड्स इंग्लिश स्कूल, गॉड ब्लेस स्कूल, चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल, पोल स्टार इंग्लिश स्कूल, मोहम्मदी उर्दू प्रायमरी स्कूल, शारदा निकेतन आणि शारदा विद्या मंदिर या शाळांवर कारवाई करण्यात आली.
अनधिकृत शाळांवरील कारवाईचा बडगा सुरू च राहणार असून पालकांनी देखील आपल्या पाल्याना प्रवेश घेते वेळी शहानिशा करणे गरजेचे असून शासनमान्यता असलेल्या शाळेतच पाल्यांचा प्रवेश करावा, असे आवाहन शिक्षण समिती सभापती पंकज कोरे यांच्या मार्फत करण्यात आले आहे.