पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या 991 जागांसाठी सरळसेवेने भरती करण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांना 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पध्दतीनं अर्ज करता येऊ शकेल. गट-क मधील २५ विविध संवर्गाच्या रिक्त पदांसाठी सरळसेवेनं ही भरती घेण्यात येणार आहे. IBPS या संस्थेसोबत पालघर जिल्हा परिषदेनं करार केला असून IBPS ही संस्था या पद भरती संदर्भात सर्व प्रक्रिया पार पडणार आहे.
आरोग्य पर्यवेक्षक पदाच्या १ जागेसाठी, आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के – ३७ जागांसाठी, आरोग्य सेवक (पुरूष) ४०% (पेसा)- ६३, आरोग्य सेवक (पुरूष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी)- ५३, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी)(पेसा)- ५८, आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)]- १५१, आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)](पेसा)- २७०, औषध निर्माण अधिकारी – ३६, कंत्राटी ग्रामसेवक – ५, कंत्राटी ग्रामसेवक (पेसा)- ४६, कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)(बांधकाम/ग्रामीण पाणी पुरवठा)- २१, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- १, कनिष्ठ आरेखक – २, कनिष्ठ यांत्रिकी – १, कनिष्ठ लेखा अधिकारी – ३, कनिष्ठ सहाय्यक – ७०, कनिष्ठ सहाय्यक लेखा – ११, तारतंत्री – १, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका – १०, पशुधन, पर्यवेक्षक – ७, पशुधन पर्यवेक्षक (पेसा) – २१, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ३३, यांत्रिकी – १, लघुलेखक(उच्च श्रेणी)- १, वरिष्ठ सहाय्यक – ११, वरिष्ठ सहाय्यक लेखा – ६, विस्तार अधिकारी (कृषि)- ७, विस्तार अधिकारी (शिक्षण)(वर्ग३ श्रेणी२)- १०, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)- ९ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे)- ४५ जागांसाठी अशा २५ संवर्गाच्या 991 जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. 01/2023 ही 05/08/2023 ला पालघर जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या जाहिराती मधील पदे पालघर जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागां मधली आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या लिंकवर दिनांक 25/08/2023 पर्यंत Online पद्धतीने अर्ज करू शकतात .रिक्त पदांचा तपशिल, पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत आणि इतर आवश्यक अटी आणि शर्ती आदी जिल्हा परिषदेच्या https://www.zppalghar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.