पालघर : पालघरमध्ये समाधान नरवाडे नावाच्या रेल्वे जीआरपीच्या पोलीस कर्मचाऱ्यानं गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. आपले वडिल घरात गळफास लावत असल्याचं या कर्मचा-याच्या ५ वर्षाच्या मुलानं पहिलं. आणि हे पाहताचं त्याने आरडाओरड सुरु केली. ते ऐकून शेजारील महिला आणि एक वृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या कर्मचा-याचे पाय वरच्या दिशेने उचलून दोरी कापून त्याला खाली घेतलं. त्यांनी तात्काळ त्यांना जवळच्या वैशाली रुग्णालयात दाखल केलं असून तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
गर्भवती महिलेचा लाकडी फळी आणि डोलीतून जीवघेणा प्रवास
यावेळी त्याच्या पत्नीने माहिती देताना सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाने एका प्रकरणात त्याला अटक केली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना नोकरीवरून बडतर्फ केलं होत. तेव्हापासून ते तणावाखाली होते. त्यांनी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही. आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी मजूरी करायला सुरुवात केली. पण समाजातील लोक त्याच्याकडे हिन भावनेने पाहू लागले होते. ज्यामुळे त्यांचा तणाव आणखीनचं वाढला आणि त्यांनी हे पाऊल उचललं.
आज दुपारी त्यांची पत्नी त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन रुग्णालयात गेली असताना त्यांनी पंख्याला दोरी बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र या कर्मचा-याच्या ५ वर्षाच्या चिमुरड्याचा रडण्याचा आवाज ऐकून एक महिला आणि वृद्ध व्यक्ती त्याठिकाणी धावत आले आणि त्यांनी त्याचा जीव वाचवला. आणि तात्काळ त्याला रुग्णालयात नेलं. दोन मिनिटांचा ही उशीर झाला असता तर शेजारी पोहोचण्यापूर्वीच या कर्मचा-याचा मृत्यू झाला असता.या पोलीस कर्मचाऱ्याला एक पाच वर्षांचं आणि एक दीड वर्षाचं अशी दोन मुलं आहेत. त्याच्या पाच वर्षाच्या चिमुकल्यानं जर वेळेचं भान ठेवून आरडाओरडा केला नसता तर आज या दोन्ही मुलांच्या डोक्यावरून वडिलाचं छत्र नाहीसं झालं असतं.