पालघर : पालघर जिल्ह्यात मनोर इथं विकी गोवारी या तरुणावर शार्क माश्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शार्क माशाने या तरुणाच्या एका पायाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खावून टाकला. ज्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी गुजरात राज्यातल्या सिलवासा मधल्या एका हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
सांगण्यात येत आहे कि, मंगळवारी संध्याकाळी उशिरा हा तरुण लाकड घेवून नदी ओलांडून घरी परतत असताना हि घटना घडली. मात्र अजून पर्यंत हे स्पष्ट होवून शकलेलं नाहीये कि शार्क माशाने या तरुणावर अचानक हल्ला केला कि, मग हि घटना शार्क माश्याला पकडण्याच्या चक्कर मध्ये घडली. समुद्रात होणा-या भरती- ओहटीच्या चक्रामुळे समुद्राशी जुळलेल्या खाडीत आणि नद्यांमध्ये समुद्राचं पाणी येत जात असतं. त्यामुळे या खाड्यांची आणि नद्यांची पाणी पातळी नेहमी वाढत आणि कमी होत असते. समुद्रात आलेल्या भरतीमुळे हा शार्क मासा वैतरणा नदीच्या पाणी पात्रात वाहून आला. मात्र पाणी कमी झाल्यानंतर हा मासा तिथेच अडकला.
घटनेची माहिती मिळताच आसपासचे लोक घटनास्थळी धावले. आणि त्यांनी या शार्क माशाला मारून टाकले. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस प्रशासन आणि वनविभागाच्या टीमने या शार्कला पीएम साठी पाठवले. पीएम नंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीने या शार्कवर पुढील प्रक्रिया करण्यात येईल. या शार्क माशांचं वजन 200 किलो पेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे.