पालघर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातल्या मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीनं शाळेतील लहान मुलांच्या माध्यमातून संकल्प पत्र हा अनोखा उपक्रम जिल्हा निवडणूक विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या उपक्रमात विविध शाळेतले विद्यार्थी हि उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत.
आपल्या घरातील लहान मुलांच्या गोष्टी घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्या आग्रहा खातर मानत असतो. त्यामुळे जर मुलांचा सहभाग या उपक्रमात करून घेतला तर नक्कीच त्यांचा हा हट्ट घरातील मोठ्या व्यक्ती पुरवतील. आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक जागृत होवून आपला मतदानाचा हक्क बजावतील. आणि त्याच्या परिणामस्वरूप जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल या आशेने हां संकल्प पत्राचा मतदान जनजागृतीपर उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात येत असल्याची माहिती पालघरच्या उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी विजया जाधव यांनी दिली.
पालघर लोकसभेसाठी उबाठा कडून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर
अंदाजे ३ हजारां पेक्षा जास्त शाळांमध्ये 7 लक्ष विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांच्या आई वडीलांकडून संकल्प पत्र भरून घेवून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थी हे आई वडिलांना त्यांनी मतदान करावं असा आग्रह करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमांतून १५ लक्ष मतदारांपर्यंत पोहचण्याचं आमचं उद्दिष्ट असल्याचं यावेळी पालघरच्या उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी विजया जाधव यांनी सांगितलं.
प्रिय आई-बाबा, मला माहित आहे कि, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करतात. माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही खूप मेहनत करत आहात. माझ भविष्य देशाच्या मजबूत लोकशाहीशी जोडलेले आहे. या करीता मी आपल्या कडून एक आश्वासन घेवू इच्छितो. येत्या २० मे २०२४ रोजी २२ पालघर (अ. ज.)लोकसभा निवडणुकीत आपण दोघेहि मतदान करून माझे भविष्य उज्ज्वल करण्यात हात भार लावाल. मला पूर्णतः खात्री आहे. मला दिलेले आश्वासन पूर्ण कराल. आपला मुलगा / मुलगी. अशा आशयाचे हे संकल्प पालघर जिल्ह्यातल्या विविध शाळां मधल्या लहान विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे. जे पत्र या विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबियांकडून सही करून भरून घेतलं आहे. आणि त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी या चिमुकल्यांनी प्रवृत्त केलं आहे.