पालघर : पालघर लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष, आणि जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भारती कामडी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपला उमेदवार म्हणून पालघर लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. लोकसभा उमेदवारीसाठी काही काळापासून पालघर जिल्ह्यात भारती कामडी यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यांनतर आज अखेर अधिकृत रित्या उबाठा गटाकडून भारती कामडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
पालघर लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. पाचव्या टप्प्यात या पालघर लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार असून या मतदार संघात आता महाविकास आघाडीने भारती कामडी यांना आपला उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं आहे. त्यानंतर आता भाजपा, शिंदे शिवसेना गटाकसून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाकडून म्हणजेच महायुतीकडून उमेदवार जाहीर होणे अजून बाकी आहे. येत्या काही दिवसांत या पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तापमानाचा पारा वाढल्यानं नागरिकांची कलिंगडला पसंती
भारती कामडी या पालघर जिल्हा परिषदेवर दोन वेळा निवडून आल्या आहेत. सव्वा वर्ष त्यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर देखील भारती कामडी यांनी ठाकरे शिवसेना गटासोबतचं राहणे पसंद केले. अलीकडच्या काळात प्रथमच याठिकाणी एका महिलेला खासदारकीची उमेदवारी देण्यात आली आहे.
२०१९ पासून पालघर लोकसभेवर शिवसेनेचं वर्चस्व असलेलं दिसून येत. त्यामुळे पालघर ला शिवसेनेचा गड मानलं जात. मध्यंतरी शिवसेने मध्ये फुट पडून दोन गट तयार झाल्याने पालघर जिल्ह्यातल्या अनेक नेते मंडळींनी शिंदे शिवसेना गटाकडे धाव घेतली. त्यामुळे या निवडणुकीत पालघर मध्ये जनता कोणत्या शिवसेना गटाला महत्व देईल हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
भारती कामडी विषयी :
भारती कामडी यांच्याकडे ठाकरे गटाचे महिला लोकसभा संघटक पद आहे. भारती कामडी या पालघर शहरात वास्तव्यास आहेत. दोन वेळा त्या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत. त्यांनी जिल्हा परिदेच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार देखील त्यांनी सांभाळला आहे.