पालघर : सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असून उन्हाळ्याच्या दिवसात पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवू लागेत. त्यामुळे या काळात नागरिकांना भेडसावणा-या पाणी टंचाईच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक निंयत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या कुठल्या हि भागात पाणी टंचाईची समस्या असल्यास नागरिकांना निंयत्रण कक्षातील ८२३७९७८८७३ आणि ०२५२५-२९७४७४ या दोन हेल्पलाईन नंबर वर संपर्क करता येवू शकेल.