पालघर : ग्रामीण जनतेला शुद्ध आणि सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी तसचं पाण्याची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी पालघर जिल्ह्यात 1 एप्रिल ते 30 एप्रिल या एका महिन्याच्या कालावधीत स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याकालावधीत ग्रामपंचायत हद्दीतल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचं स्वच्छता सर्वेक्षण मोहिम स्वरूपात राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी तालुक्यांना दिले आहेत.
महाराष्ट्रात 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण नारीशक्तीच्या हातात
जिल्ह्यात दरवर्षी आरोग्य विभागाकडून स्वच्छता सर्वेक्षण केलं जात. साधारण पावसाळ्यापुर्वी एप्रिल महिन्यात आणि पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात हे सर्वेक्षण केलं जात. यात ग्रामपंचायत हद्दीत अस्तीत्वात असलेल्या सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचं स्वच्छता सर्वेक्षण करणं, ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध असलेल्या क्षेत्रीय तपासणी संचाचा (FTK) वापर करून प्रत्यक्ष स्त्रोताच्या ठिकाणी जावून नमुन्यांची तपसाणी करणं, स्त्रोत आणि स्त्रोतांच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ करून घेणं, जवळपास राहणाऱ्या कुटूबांशी संवाद साधणं, लाल कार्ड आणि पिवळे कार्ड प्राप्त ग्रामपंचायतींची विशेष तपासणी करून प्राप्त असणाऱ्या पिवळ्या कार्डाचे हिरव्या कार्डात रूपांतर होण्यासाठी विशेष प्रयत्न करणं, स्वच्छता सर्वेक्षण कालावधीत तीव्र जोखीम, मध्यम जोखीम आणि कमी जोखीम असे स्त्रोतांचे वर्गीकरण करून स्वच्छता सर्वेक्षणात आढळून आलेल्या कारणानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आदी विशेष उपक्रम या एका महिन्याच्या काळात राबवावेत अशा सुचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक शरदचंद्र माळी यांनी संबधित अधिका-यांना आणि कर्माचा-यांना दिल्या आहेत.