पालघर : नरवीर चिमाजी अप्पा ( Chimaji Appa’s victory ) यांच्या शौर्यानं प्राप्त झालेल्या वसई किल्लाचा विजय दिन दरवर्षी वसई किल्ल्यावर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा या विजयोत्सव दिनाचं हे 286 वं वर्ष आहे. या दिवशी वसई विजयोत्सव दिन ( Vasai Vijay Utsav ) नामक एकदिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलं जात. वसई किल्ला इतिहास, ऐतिहासिक वास्तू आणि इथलं पर्यटन, लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी या उद्देशानं दरवर्षी इथं वसई विजयोत्सव दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जात.
परंपरेप्रमाणे बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवारी वज्रेश्वरी देवीच्या मंदिरातून मशाल प्रज्वलित करून ती मोटार बाईक रॅली द्वारे वसईच्या पारनाक्याजवळ आणण्यांत येईल. त्यानंतर पारनाका ते नरवीर चिमाजी अप्पा स्मारकापर्यंत मशाल मिरवणूक काढण्यात येईल.