पालघर : वसई विरार महापालिकेने शहरातल्या नाल्यांची सफाई करण्यासाठी ड्रेन मास्टर या अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापर करण्यास सुरुवात केली आहे. आणि त्याद्वारे नाल्यांची साफसफाई करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पोकलेन मशीन किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणच्या नाल्यातला गाळ काढण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात आहे. अशा प्रकारची यंत्रसामुग्री वापरणारी दिल्ली नंतरची वसई विरार ही दुसरी महानगरपालिका ठरली आहे.
देशाच्या गतीला तिपटीने वाढवण्यासाठी ही निवडणूक आहे – गृहमंत्री अमित शहा
सध्या वसई विरार महापालिकेकडून ९ प्रभागात नालेसफाईचे काम करण्यात येत आहे. आतापर्यंत ६८ % नालेसफाईचं काम पूर्ण झालं आहे. पाण्यातून किंवा दलदलीच्या भागातून गाळ काढण्यासाठी पालिकेनं ड्रेन मास्टर या आधुनिक यंत्राचा वापर सुरू केला आहे. या यंत्राची किंमत १ लाख ७४ हजार असून पालिकेनं १५ व्या वित्त आयोगातून ३ लाख ४८ हजारांची दोन ड्रेन मास्टर यंत्रे आणली असल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.