पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विविध भागात आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देण्यात आला. जिल्ह्यात दीड दिवसांच्या ४४१५ पेक्षा जास्त घरगुती गणपतींना आणि २४८ पेक्षा जास्त सार्वजनिक गणपती बाप्पांना आज निरोप देण्यात आला. यावेळी ठीक ठिकाणी असलेल्या गणेश कुंडांमध्ये किंवा तळ्यांमध्ये, नद्यां मध्ये बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. पालघरच्या गणेश कुंडावर ही आज विसर्जनासाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी भक्तांनी मोठ्या भक्ती भावाने पूजा आरती करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आपल्या आवडत्या बाप्पाला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला.
पालघर जिल्ह्यात नोकरीची सुवर्ण संधी…
तसचं पालघर जिल्ह्यातल्या वसई – विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या जवळपास १०५ कृत्रिम तलावां मध्ये दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. विसर्जणा दरम्यान कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी यासाठी विसर्जन स्थळांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.