पालघर : महाराष्ट्रातल्या ४३४ आयटीआय कॉलेज मध्ये आज संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. त्याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातल्या 7 शासकीय आयटीआय कॉलेज मध्ये आज संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्या त्या आयटीआय कॉलेज मध्ये लोकार्पण सोहळयाचं संपूर्ण प्रक्षेपण दाखवण्यात आलं. जिल्ह्यातली आयटीआय कॉलेज दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी जोडली गेली होती.