राहुल गांधींचं पास पोर्ट रद्द केलं पाहिजे – आठवले
पालघर : दलितांच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, त्यांचं आरक्षण आहेच तसचं राहील. आरक्षणा बद्दल वाद न करता आरक्षणाचा विषय कुठे तरी आता संपला पाहिजे असं असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले केलं.
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधल्या सेंट मेरी हायस्कूल मध्ये कानपूरच्या एलिम्को संस्थेकडून दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 75 सामाजिक अधिकारिता शिबिरांच्या माध्यमातून दिव्यांगांना केंद्र सरकारच्या एडिप योजनेच्या अंतर्गत मोफत सहायक उपकरणांचं वाटप यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जवळपास 200 दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचं वाटप केलं गेलं.
यावेळी उपस्थित दिव्यांगाना संबोधित करताना ते म्हणाले की, अगोदर अपंग हा शब्द वापरला जात होता पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकलपनेतून त्यांनी दिव्यांग हा शब्द आणला. त्यांनी दिव्यांगा साठी महत्वपूर्ण कार्य केलं आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार केलं ज्याच्या माध्यमातून दिव्यांगांचे प्रश्न सोडवले जातील.
रिपब्लिकन पक्ष देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी, महिलांना, दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी मोदींसोबत आहे असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. वाढवण बंदरा विषयी बोलताना ते म्हणाले, की देशातलं हे मोठ बंदर असून देशाच्या आर्थिक विकासात त्याचा मोठा वाटा असेल. हे होत असताना कोणावर ही अन्याय होणार नाही अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
या कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री आठवले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. बाहेर जावून देशाची निंदा करणं योग्य नाही. अशाप्रकारे राहुल गांधींनी परदेशात जावून केलेलं व्यक्तव्य हे निंदनीय आहे. राहुल गांधीच्या या वक्तव्याचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला येत्या निवडणुकीत बसेल असं मत केंद्रीय मंत्री आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. राहुल गांधी यांचं पासपोर्ट रद्द केलं पाहिजे जेणे करून ते परदेशात जावून देशाची निंदा करू शकणार नाहीत असं ही आठवले यांनी म्हटलं.