पालघर : पालघर जिल्ह्यात स्वच्छतेची शपथ घेवून या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा अभियाला सुरुवात झाली आहे. याच स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत पालघर तालुक्यातल्या बिरवाडी आणि उमरोळी भागात पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या उपस्थितीत मंदीर परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी स्वतः आणि त्यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत मंदिर परिसराची स्वच्छता केली.
हेही वाचा : खाद्यतेलाच्या आयातीवर आता आकाणार 20 टक्के शुल्क
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचं अनुषंगानं दरवर्षी प्रमाणे यंदा ही स्वच्छता ही सेवा मोहिम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवाड्याच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव स्तरावर राबवण्यात येत आहे. यंदाच्या या स्वच्छता अभियानाची थीम “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही आहे.