प्लास्टिक रिसायकलिंगचा प्रयोग
पालघर : दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिवस साजरा केला जातो. सद्या जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधी दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात येत आहे. याच अभियाना एक भाग म्हणून आणि आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिनाचं औचित्य साधत वसई विरार शहर महानगरपालिकेकडून पालघर जिल्ह्यातल्या राजोडी समुद्रकिनाऱ्यावर बीच क्लिनअप ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं होत.
हेही वाचा : दलितांच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
या बीच क्लिनअप ड्राईव्ह मध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, शाळा , कॉलेजां मधले विद्यार्थी, विविध संस्था, बचत गटांच्या महिला, नागरिक आदी हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते. या वेळी बीच क्लिनअप ड्राईव्ह मध्ये सहभागी लोकांनी राजोडी समुद्र किनाऱ्यावर असलेला कचरा स्वच्छ केला. आणि तो जमा झालेलं प्लास्टिक रिसायकलिंग देण्यात आलं. यावेळी बीच स्वच्छतेसाठी २० झोन तयार करण्यात आले होते. प्रत्येक झोन मध्ये ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी गो शून्य या संस्थेकडून प्लास्टिक रिसायकलिंगच्या माध्यमातून टाकाऊ प्लास्टिक पासून टिकाऊ वापरा योग्य वस्तू कशा तयार करतात येतात याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना, उपस्थित नागरीकांना करून दाखवलं. यावेळी गो शून्य संस्थेकडून टाकाऊ पासून तयार करण्यात आलेल्या कुंड्या, ग्लास, कप, किचेन, डायरी यासारख्या विविध टिकाऊ वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.
भरती ओहोटीमुळे किनाऱ्यांवरील कचरा समुद्रात जातो, ज्यामुळे सागरी परिसंस्था असुरक्षित होते. यामुळे जलप्रदूषण वाढते. असे अस्वच्छ किनारे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या आरोग्यसाठी धोकादायक असतात. हे टाळण्यासाठी किनाऱ्यांची सफाई होणे आवश्यक असते.