पालघर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पालघर जिल्ह्यातल्या 31 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन पार पडलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्धा इथं आयोजित कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या 31 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन केलं. पालघर जिल्ह्यातल्या यशवंतराव चाफेकर महाविद्यालयात आज कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी विद्यालयातले विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमात जोडले गेले होते. यावेळी विश्वकर्मा योजनेचा लाभ घेतलेल्या 28 लाभार्यांना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या हस्ते पी.एम विश्वकर्मा प्रमाण पत्रांचं वाटप करण्यात आलं. या सह जिल्ह्यातल्या इतर 30 विद्यालयामध्ये ही या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत.
हेही वाचा : एचडीआयएल घोटाळा प्रकरणाला लागले वेगळे वळण
या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून तरुण तरुणींना मोफत कौशल्य विकास अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या 31 महाविद्यालयां मध्ये प्रत्येकी 150 विद्यार्थ्यांना स्कील बेस शोर्ट टर्म कोर्सेसचं प्रशिक्षण देण्यात येणार असून या माध्यमातून जिल्ह्यातून जवळपास 4 हजार 650 विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातल्या युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यातल्या नामांकित महाविद्यालयां मध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या आधारे राज्यातल्या 1000 नामांकित महाविद्यालयां मध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ची स्थापना करण्यात येणार आहे. राज्यातल्या 1000 विद्यालयांमध्ये पालघर जिल्ह्यातल्या 31 महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.