पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर जवळील तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या प्लॉट नं. N-102, मे.कॅलिक्स केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लि. या केमिकल कंपनीत शुक्रवारी दुपारच्या दरम्यान स्फोट होवून भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील राज मौर्य ( 45 वर्षे ), निशिकांत चौधरी ( 36 वर्षे ), पवन देसले ( 32 वर्षे ), संतोष हिंदळेकर ( 49 वर्षे ), आदेश चौधरी ( 25 वर्षे ), चंदन शहा ( 32 वर्षे ) हे कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर तुंगा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी दुपारच्या दरम्यान कंपनीत उत्पादन प्रक्रिया सुरु असताना स्फोट होवून ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.