पालघर : पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत निवड झालेल्या 182 उमेदवारांना आज नियुक्ती आदेश देण्यात आले. पालघर जिल्हा परिषद कार्यालयातल्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात आयोजित कार्यक्रमात आज 10 वरिष्ठ सहायक, 45 कनिष्ठ सहाय्यक, 8 शिक्षण विस्तार अधिकारी, 27 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 18 कनिष्ठ अभियंता(स्थापत्य), 34 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, 7 पशुधन पर्यवेक्षक, 29 औषध निर्माण अधिकारी, 4 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) अशा 182 उमेदवारांना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती आदेश देण्यात आले.