पालघर : पालघर जिल्ह्यात सुरु असलेल्या स्वच्छता हि सेवा कार्यक्रमा अंतर्गत स्वच्छता अभियानात सहभागी होत पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने शिरगाव बीच असलेला कचरा उचलून समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाच्या १७० स्वयंसेवकांच्या सहभागाने ही स्वच्छता मोहीम राबविली आली.
स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. अरुंधती बेर्डे, प्रा.राजू तांडेल, डॉ. प्रकाश घरत, डॉ. संगीता ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य प्रा. डॉ. तानाजी पोळ, प्रा. महेश देशमुख, संस्थेचे अध्यक्ष सीए.सचिन कोरे आणि पदाधिकारी तसेच पालघर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आदींचे सहकार्य लाभले.