जागतिक स्तरावर मिळाली मान्यता
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आरोग्य ही मोठी समस्या आहे. खासकरून आदिवासी बहुल भागात. या समाजाच्या बांधवांकडे न त्यांच्या आजाराच्या बाततीत काही कागद पत्र असतात, न कोणत्याही डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केल्याची फाईल. मग अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या आजारावर उपचार घ्यायचा असेल तर समोरच्या डॉक्टरांना त्त्या रुग्णाची मागील आजाराची हिस्ट्री माहिती नसते. आणि मग उपचार करणे कठीण होवून जात.
ही समस्या ओळखून पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात काम करत असलेल्या केशव सृष्टी या संस्थेनं डिजिटल हेल्थ लॉकेट तयार केले आहेत. त्यांनी हा प्रयोग पहिल्यांदा पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात करून पाहिला. ज्याला जागतिक स्तरावर देखील मान्यता मिळाली आहे. नानाजी देशमुखांच्या समाज शिल्पी दाम्पत्याच्या आधारे डॉ. सुरेश यांनी स्वास्थ्य रक्षक दाम्पत्य ही संकल्पना पुढे आणली. यासाठी त्यांनी जिल्ह्यातल्या अनेक भागातल्या गावात स्वास्थ रक्षक दाम्पत्य तयार केले. त्यांना संस्थेच्या माध्यमातून याविषयीचं प्रशिक्षण दिलं. त्यांतर या स्वास्थ रक्षक दाम्पत्यांनी गावातल्या नागरिकांची नियमित तपासणी सुरु केली. गावात विविध प्रकारचे आजार असलेल्या घरांवर कोड स्वरुपात टिकल्या लावण्यात आल्या. ते पाहताच त्या घरात कोणत्या आजाराचा रुग्ण आहे हे क्षणात ओळखता येत. त्यातून त्यांना गावतल्या लोकांना कोणकोणते आजार आहेत हे समजू शकलं. स्वास्थ्य रक्षक दाम्पत्यांनी हा डेटा कलेक्ट केला. आणि त्या माध्यामतून त्यांनी गावागावात जावून परिवार स्वास्थ्य कार्ड तयार केले. त्या परिवार स्वास्थ्य कार्ड च्या आधारे ग्राम स्वास्थ्य नकाशे तयार करण्यात आले. आणि प्रत्येक गावाच्या समाज मंदिरात हे नकाशे लावण्यात आले आहेत.
हेही वाचा : बचत टाच्या महिला निर्माल्यातून करतायेत खत निर्मिती
डिजिटलायजेशन करण्याच्या दृष्टीने परिवार स्वास्थ्य कार्ड लां डिजिटल करून त्याला एक क्युआर कोड देण्यात आला. आणि हा क्यूआर कोड एका लॉकेट मध्ये बंद करण्यात आला. आदिवासी समुदायाचे लोकं सहसा गळ्यात लॉकेट घालनं पसंद करतात. त्यामुळे त्या मेटल बेस क्यूआर कोड ला लॉकेट स्वरूप देण्यात आलं. ते सुंदर दिसावं म्हणून त्यावर वारली पेटिंग देखील साकारण्यात आली आहे. हा क्यूआर कोड केवळ डॉक्टरचं ओपन करून बघू शकतात. इतर कोणाला ही यातील डेटा पाहता येवू शकणार नाही. त्यामुळे हे डिजिटल लॉकेट पूर्ण पणे सुरक्षित आहे. त्याचा कोणत्याही प्रकारे मिसयूज होवू शकत नाही. या क्यूआर कोड ला डॉक्टरांनी स्कॅन केल्यास क्षणार्धात त्यातून त्यांना समोरच्या व्यक्तीची मेडिकल हिस्ट्री मिळू शकेल. विक्रमगड मधल्या अनेक गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना हे डिजिटल हेल्थ लॉकेट केशवसुष्टी संस्थेकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे आता या तालुक्यां मधल्या नागरिकांना हॉस्पिटल मध्ये जाताना सर्वच मेडिकल फाईल घेवून जाण्याची आवश्यकता भासणार नाहीये.
पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या ३३ गावात सुरू करण्यात आलेला हा प्रयोग आता ५० गावां मध्ये करण्याचा आपला मानस असल्याचं केशव सृष्टीचे डॉ.सुरेश सरवडेकर सांगतात.