पालघर : वाचनाने प्रत्येक व्यक्ती समृद्ध होते, त्याचा सर्वांगीण विकास तर होतोच पण त्याच्या वाचनाचा समाजाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा होत असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन केलेच पाहिजे, असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सी.ए.सचिन कोरे यांनी केले.दांडेकर महाविद्यालयाच्या रा. हि. सावे ग्रंथालयाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
भारताचे दिवगंत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ अभिवाचन स्पर्धा आयोजित केली होती. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष सी.ए सचिन कोरे हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व विशद करून स्पर्धकांचे मार्गदर्शन आणि कौतुक केले.
या कार्यक्रमात संस्थेचे सचिव सुधीर कुलकर्णी, सचिव अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ. तानाजी पोळ, उपप्राचार्य प्रा.महेश देशमुख, प्रा.विवेक कुडू आदी उपस्थित होते. या ग्रंथ अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला या निमित्त सहभागी झालेल्या आणि प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ग्रंथ आणि प्रमाणपत्र बक्षीस स्वरुपात देण्यात आले. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून डॉ. दर्शना म्हात्रे यांनी भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. शीला गोडबोले पाईकराव यांनी केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.