पालघर : सत्तेवर येताच शंभर दिवसांच्या आत कोशियारी समिती अहवालाप्रमाणे पेन्शन वाढ करु असं आश्वासन सरकारने पेन्शन धारकांना दिलं होत. मात्र अजून पर्यंत पेन्शन वाढ झाली नसल्यानं आज देशभरातील ईपीएस-९५ पेन्शन धारकांनी आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आज जिल्ह्यातल्या पेन्शन धारकांनी आंदोलन केलं. आणि त्यानंतर जिल्हाधिकारी बोडके यांच्या द्वारे पंतप्रधानांना निवेदन देण्यात आलं.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर, सरचिटणिस प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष अशोक राऊत, खजिनदार रविंद्र कदम, संघटक सचिव हेमंत पाटील, उपाध्यक्ष भगवान सांबरे आदींनी पेन्शन धारकांच्या व्यथा मांडल्या.
दोन महिन्यांच्या कालवधीत या आंदोलनाची दखल न घेतल्यास आम्ही दिल्लीत करो या मरो पध्दतीने आंदोलन करू असा ईशारा ही यावेळी पेन्शन धारकांकडून देण्यात आला आहे.