रायगड : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल शहर पोलिसांनी बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचणे, तसेच त्याच्या राहत्या घरावर फायरींग करून सलमान खानला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या टोळीतील मुख्य आरोपीला हरियाणातील पानिपत मधून अटक केली.
सुख्खा शूटर असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगतिले. १४ एप्रिल २०२४ रोजी काही संशयित आरोपींनी सिने अभिनेता सलमान खान यांच्या मुबई येथील राहत्या घरावर फायरींग करून सलमान खान ला मारण्याचा प्रयत्न केला होता.
ही घटना घडल्या नंतर मुबई पोलीस तसेच नवी मुबई पनवेल पोलिसांनी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली होती. हे दोन आरोपी काही दिवस पनवेल येथे वास्तव्याला आल्याचे समोर आले होते. या दोघांच्या अटके नंतर या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती.
मात्र, या टोळीचा मुखींया मोस्ट वॉन्टेड आरोपी चा शोध पोलीस घेत होते. त्यानंतर सुख्ख्या शूटर असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, तो पोलिसांना चकवा देण्यात वारंवार यशस्वी होत होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पनवेल शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. पनवेल शहर पोलिसांच्या पथकांनी हरियाणा येथील पानिपत मधून त्याला अटक केली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना त्याच्याविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार किरण सोनवणे, नितीन वाघमारे यांनी पानिपत येथे जाऊन सुख्खा शूटरला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली.
सुख्खा फायरींग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. इतर सहकार्यांना पैसे, हत्यार पुरवणे ही जबाबदारी त्याच्यावर होती. सुख्खा याने स्वतः सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊस ची रेखी केली होती. आणि सलमानला रस्त्यातचं गाठून ठार करण्याचा प्रयत्न त्याचा होता, अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.