पालघर : आदिम जमातीचे संरक्षण व विकास कार्यक्रमा अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या चार तालुक्यातल्या आदिम जमातीच्या (कातकरी) लाभार्थ्यांसाठी Training Programme For Agri & Animal Husbandary For PVTG`S (शेती व शेतीशी निगडीत पशुपालन प्रशिक्षण देणे) या योजनेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
या योजनेव्दारे आदिम जमातीच्या शेतकऱ्यांना कृषी,पशुपालन याबाबत मुलभुत प्रशिक्षण देणं, त्यांना कृषी आणि पशुपालन या बाबत अद्यायावत तंत्रज्ञान शिकवणं आणि त्याबाबत त्यांची क्षमता बांधणी करुन त्यांचं उत्पादन वाढविणं यासाठी शेतकऱ्यांना एकात्मिक किड नियंत्रण, शेंद्रीय शेती व पध्दती, मृदा संवर्धन, शेळीपालन, कुक्कुटपालन व व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय व्यवस्थापन, कृषी माल प्रकीया व विपणन, जल व्यवस्थापन आदीं बाबत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ही योजना कातकरी लाभार्थ्यांसाठीच असल्यानं कातकरी लाभार्थ्यांनी लाभार्थ्यांनी संपूर्ण कागदपत्रांसह 2 नोव्हेंबर पासून ते 12 नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीत आपापले अर्ज जमा करायचे आहेत.
अटी व शर्ती तसेच कागदपत्रे :
लाभार्थी हा आदिम जमातीचाच असावा, जातीचा दाखला जोडण्यात यावा, लाभार्थ्यांकडे शेतजमीन असावी त्यासाठी सातबारा किंवा वनपट्टा धारक असल्याचा दाखला जोडण्यात यावा, लाभार्थ्यांचा रहीवाशी दाखला असावा, ग्रामसभेचा ठराव असावा, लाभार्थ्याचे आधारकार्ड व रेशनकार्ड च्या छायांकीत प्रती अर्जासोबत सादर कराव्या, अर्जासोबत अलीकडे काढलेले 2 पासपोर्ट आकाराचे फोटो जोडण्यात यावे, विधवा,परितक्त्या ,दिव्यांग कातकरी लाभार्थ्यांना योजन मंजुर करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.